accident

दोन अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
माजलगाव दि.4 ः अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर माऊली फाट्या जवळ शुक्रवार (दि.4) रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली. बाळू पंडित कावळे (वय 32 रा.कर्ला ता.जि.जालना) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. बाळू आपल्या दुचाकीवरुन (एमएच-21 4084) गावी जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला राष्ट्रीय महामार्ग 222 वरील तालखेड माऊली फाट्याच्या जवळ अज्ञात वाहनाने जारोची धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. पुढील तपास पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पिकअपच्या धडकेत
दुचाकीस्वाराचा मृत्यू
गेवराई ः तालुक्यातील सिरसदेवी फाटा येथे पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.4) रात्रीच्या सुमारास घडली.
गणेश रुपबा भंडारी (वय 38 भेंडटाकळी ता.गेवराई) असे मयताचे नाव आहे. ते स्कुटीवरुन (एमएच-14 सीएस-8372) भेंडटाकळीकडे जात होते. यावेळी समोरुन आलेल्या बोलेरो पिकअपने (एमएच-44 यू-0980) जोराची धडक दिली. यामध्ये गंभिररित्या जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.4) रात्री 9 च्या सुमारास सिरसदेवी फाट्याजवळ शिवनेरी हॉटेलसमोर घडली. घटनास्थळी महामार्ग पोलीस राधाकिसन नेवडे, किशोर सोनवणे, अनंत गिरी, अमर घुगे, गणेश चौघुले यांनी धाव घेत मृतेदह गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.

Tagged