रोहित्राचा स्फोट होऊन युवकाचा मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.15 : बीड तालुक्यातील आहेरवडगाव येथे रोहित्राचा स्फोट मोठा स्फोट झाला. या स्फोटात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.15) सकाळी घडली.
गणेश सुनिल तावरे (वय 20 रा.आहेरवडगाव ता.बीड) असे मयताचे नाव आहे. येथील एका रोहित्राचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात गणेशचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोउपनि.रोटे, सोनवणे, आनंद मस्के आदींनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. स्फोट कशामुळे झाला? याचा तपास पोलीस करत आहेत.

Tagged