DEVENDRA FADANVIS

सचिन वाझे, परमबीर सिंग हे फक्त प्यादे; त्यांचे ‘पॉलिटीकल बॉस’ शोधून काढा

क्राईम देश विदेश न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे गंभीर आरोप

नवी दिल्ली, दि. 17 : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा खळबळजनक आरोप केला. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीन कांड्या असलेली स्कॉर्पिओ प्रकरण हे खूप मोठं षडयंत्र आहे. या खेळातील एपीआय सचिन वाझे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे खूप छोटे प्यादे आहेत. त्यांचा पॉलिटीकल बॉस वेगळा आहे. तो शोधून काढावा, तपास यंत्रणांनी त्यांचा शोध घ्यावा. शिवाय वाझे हे कुणासाठी काम करीत होते, ते पैसे गोळा करण्यासाठी नेमलेले अधिकारी होते असा गंभीर आरोप देखील फडणवीस यांनी केले.

फडणवीस म्हणाले, मुंबईतील सट्टा बाजारात सचिन वाझे याचा थेट संबंध होता. सचिन वाझे यांना निलंबीत करण्यात आले होते. त्यांनी व्हीआरएस घेतलेला होता. परंतु त्यांना पुन्हा सेवेत घ्यावे, म्हणून शिवसेनेने मी मुख्यमंत्री असताना माझ्यावर दबाव टाकला होता. पण मी त्यांचा पुर्वइतिहास पाहून त्यांना सेवेत घेतले नाही. महाराष्ट्रात जेव्हा कोरोना आला त्यावेळी पोलीस दलाला माणसांची कमतरता भासू लागली हेच भांडवल करून शिवसेनेनं त्यांना सेवेत रुजू करून घेतलं, असाही आरोप फडणवीस यांनी केला आहे. मुंबईत घडलेल्या अनेक हायप्रोफाल केसमध्ये सचिन वाझे हेच तपास अधिकारी कसे काय असू शकतात? मनसुख हिरेन आणि सचिन वाझे हे एकमेकांच्या परिचयातील होते. वाझे यांनी मनसुख यांचा खून करून त्यांना खाडीत टाकले. परंतु त्यांचा टायमींग चुकल्याने समुद्राला अर्धातास लेट भरती आली. त्यात तिथेच वाळूत मनसुख यांचा मृतदेह रुतून बसला, असा आरोपही फडणवीस यांनी केला. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये त्यांच्या फुफ्फुसात पाणी नसल्याचे पुढे आले आहे. हे शक्यच नाही. मनसुख हिरेन यांना आधी मारण्यात आले आणि नंतर त्यांना खाडीत फेकून देण्यात आले. त्यामुळे खून प्रकरणाचा तपास देखील एनआयएने आपल्याकडे घ्यावा, अशी मागणी देखील फडणवीस यांनी केली आहे.

Tagged