Sharad Pawar

अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतली -शरद पवार

देश विदेश न्यूज ऑफ द डे राजकारण

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि.21) पत्रकार परिषद घेऊन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटींच्या आरोपाबांबत भाष्य केलं. दिल्ली येथील निवासस्थानी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शरद पवार म्हणाले, सचिन वाझे प्रकरणात तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी माझी भेट झाली होती. त्यानंतर काल त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातून गंभीर आरोप केले. परंतू, त्या पत्रावर हस्ताक्षर नाहीत. तसेच, त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त या पदावर असताना कोणतेही आरोप केलेले नाहीत, तर त्यांची बदली झाल्यानंतर हे आरोप केले. तसेच, 100 कोटी कुणाकडे गेले याचा या पत्रात उल्लेख नाही. आयुक्त परमबीर सिंग यांनी सचिन वझेंना पोलिस दलात घेतले. त्यानंतर वझेला संवेदनशील केसमध्ये घेतले. वाझेंना पोलिस दलात घेण्यास पोलिस आयुक्त जबाबदार आहेत. माजी पोलिस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांच्यामार्फत आयुक्तांच्या आरोपांची चौकशी करावी. आयुक्तांच्या आरोपांची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांना पूर्ण अधिकार आहेत. तसेच, अनिल देशमुख यांच्याबद्दल आमच्यात अद्याप चर्चा झालेली नाही. त्यांच्या राजीनाम्याबद्दल मुख्यमंत्री ठरवतील, असे मोठे विधान केले.

Tagged