झेंड्यावरून तणाव; अनेकांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता

कोरोना अपडेट मराठवाडा

तालुका प्रशासन ठाण मांडून
पैठण : तालुक्यातील पाचोड ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हर्षी खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर पिवळ्या रंगाचा झेंडा अज्ञात व्यक्तीने लावल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यांतर हा झेंडा तत्काळ काढून घेण्यात यावरून गावात तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरापर्यंत प्रशासन गावात ठाण मांंडून होते.

तहसीलदार दत्तात्रय निलावाड, सपोनि.गणेश सुरवसे यांनी रात्री उशिरा ग्रामस्थांची बैठक घेऊन पिवळ्या रंगाचा झेंडा काढून घेण्यासाठी तालुका प्रशासनाच्यावतीने प्रयत्न केला. परंतू झेंड्यासाठी पर्यायी जागा दिल्यासच झेंडा हटविण्यात यावा अशी काही जणांनी भुमिका घेतली. त्यामुळे तणाव वाढण्याची शक्यता असल्याने प्रभारी तालुका दंडाधिकारी निलावाड यांनी ग्रामसेवकासह तलाठ्यास पोलिसात तक्रार दाखल करून गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सामाजिक शांततेसह कोरोना साथरोग प्रतिबंध कायद्याचा भंग केल्याप्रकरणी झेंडा लावणार्‍या अज्ञात व्यक्तीसह काही ग्रामस्थांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गावात कुठलाही वाद निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Tagged