पैठण तालुक्यातील हर्षा येथील झेंड्याचा वाद कायम

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

पैठण दि.26 : पैठण तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हर्षी खुर्द गावांमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी पिवळ्या रंगाचा झेंडा विनापरवाना ग्रामपंचायत कार्यालयासमोर लावला. यामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी प्र.तहसीलदार दत्तात्रेय निलावाड, सपोनि गणेश सुरवसे यांनी गावकर्‍यांची बैठक घेतली. मात्र तरी देखील झेंडा हटविण्याचा प्रश्न मिटत नसल्याने कायदेशीर मार्गाने झेंडा हटविण्याची जबाबदारी संबंधित गावाचे ग्रामसेविकेला दिली. पंचायत समितीचे जबाबदार गटविकास अधिकारी व विस्ताराधिकारी यांनी गावात भेट न देता पाठ फिरविल्यामुळे या प्रकरणाचा गुंता अधिकच वाढत चालला आहे.
       दोन दिवसापूर्वी लॉकडाऊन काळामध्ये पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हर्षि खुर्द गावात काही अज्ञात व्यक्तीने ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर पिवळा झेंडा लावला. त्या ठिकाणी बांधकाम केल्याने या प्रकारामुळे गावात झेंडा काढून घेण्यासाठी वाढता विरोध होत असल्याने तहसीलदार दत्तात्रेय निलावाड, सपोनि.गणेश सुरवसे यांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत संबंधित गावाचे नागरिक व तंटामुक्त समितीचे सदस्य यांची संयुक्त बैठक घेतली. झेंड्याच्या प्रकरणात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु काही ग्रामस्थांची विरोधातील भूमिका असल्याने तालुका प्रशासनाच्या वतीने संबंधित गावाच्या ग्रामसेविका यांनी कायदेशीर मार्गाने लावण्यात आलेला झेंडा काढून घेण्यासाठी प्रयत्न करावा असा आदेश दिला. या गावाच्या ग्रामसेविका श्रीमती रुपनार यांनी रविवारी सकाळी झेंडा काढून घेण्यासाठी प्रयत्न केले. परंतु कायदेशीर मार्ग तक्रार दाखल करण्यासाठी पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे येथील गटविकास अधिकारी बागुल व या ग्रामपंचायतीचे विस्ताराधिकारी यांनी गावात भेट न देता पाठ फिरविल्यामुळे कायदेशीर आदेश घेण्यासाठी ग्रामसेविका पुढं प्रश्न निर्माण झाला आहे.

Tagged