maratha arakshan

मराठा समाज आक्रमक; बीडमधून १६ मे रोजी निघणार पहिला मोर्चा

बीड

बीड : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याचा निकाल दिला. त्यानंतर मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसून येत आहे.

बीड येथे आज (दि.६) समाजबांधवांची बैठक पार पडली असून मोर्चा काढण्याचा निर्णय झाला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना उद्या (दि.७) भेटून निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर १६ मे रोजी पहिला मोर्चा काढण्यात येणार असून हे मोर्चे राजव्यापी होतील असे शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांनी म्हटले आहे.

Tagged