बीड जिल्हाधिकार्यांचे नवे आदेश
बीड : गत दिवसांपासून बीड जिल्ह्यातील लॉकडाऊन कडक करण्यात आला होता. या काळात सर्वकाही बंद होते. आता पुन्हा एकदा जिल्हाधिकार्यांनी बुधवारपर्यंत हाच लॉकडाऊन कायम ठेवला असून अत्यावश्यक सेवेतील सामाविष्ट लोकांनाच प्रवासास मुभा असणार आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी शुक्रवारी हे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार रोजी म्हणजे दि.8 ते 12 मे रोजीपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. या काळात वैद्यकीय आस्थापनेशी संबंधित वगळता किराणा दुकानांसह सर्व प्रकारची दुकाने, कृषी संबंधित आस्थापना बंद असणार आहेत. तसेच, गॅस वितरण सुरु राहील. तर शनिवार व बुधवारी सकाळी 7 ते 10 व सायंकाळी 5 ते 7 या वेळेत केवळ फिरून दुध, भाजीपाला, फळे विक्री करता येणार आहे. तसेच, अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना ओळखपत्र बंधनकारक असणार आहे.