mahatma phule jan arogya yojana

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत असतानाही बील आकारणार्‍यांकडून होणार वसुली

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

ओमप्रकाश शेटे यांच्या याचिकेवर हायकोर्टाच्या आदेशाने जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

रुग्णालयाने पैसे घेतले असतील तर जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज करण्याचे शेटे यांचे अवाहन

बालाजी मारगुडे । बीड

बीड- राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी करावी, म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 7 मे रोजी सुनावनी झाली. त्यात खंडपीठाने म्हटले की राज्य शासनाने या योजनेत दिलेल्या उदीष्टाप्रमाणे राबवावी. एकही रुग्ण केवळ आर्थिक कारणामुळे उपचारापासून वंचित राहू नये. याची राज्य शासनाने काळजी घ्यावी असे म्हटले. त्यावर शेटे यांनी आक्षेप घेत लाभार्थी असुनही रुग्णांना मोफत उपचार दिले जात नाहीत, त्यांच्याकडून बीले घेतली जातात असे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर खंडपीठाने म्हटले अशा रुग्णाने जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करावी, जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या तक्रारीचे निराकारण करावे, असे म्हटले आहे. त्यामुळे ज्यांनी या योजनेच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आहेत, मात्र बीलाचा भरणा केला आहे, त्यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे लेखी स्वरुपात अर्ज करावेत, असे अवाहन शेटे यांनी केले आहे.

ओमप्रकाश शेटे यांनी म्हटले आहे की, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत जिल्ह्यातील अनेक हॉस्पिटल आहेत. त्यांनी आतापर्यंत महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेतलेला आहे. मात्र कोविडच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत ही रुग्णालये रुग्णांना अजिबात सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे मी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यात म्हटले होते की या योजनेचा लाभ केवळ व्हेंटीलेटरवरील गंभीर रुग्णांना देण्यात येतो, मात्र कोविडच्या सर्व रुग्णांना याचा लाभ देण्यात यावा, अशी माझी मागणी होती. त्यावर खंडपीठाने राज्य शासनाला यावर तुमची काय भुमिका आहे अशी विचारणा केलेली होती. तेव्हा राज्य शासनाने याचिकाकर्त्यांच्या विनंतीनुसार व्हेंटीलेटरवरील आठ उपचारासहीत अन्य 20 उपचार कोविड 19 च्या रुग्णांना मोफत देण्याचे शपथपत्र दिले. त्यानंतर राज्य शासनाच्या या शपथपत्रावर आम्ही आक्षेप घेत योजनेची रुग्णालये मोफत उपचार देत नाहीत. असा आक्षेप घेतला. त्यासाठी खंडपीठाकडे 20 ते 25 नागरिकांनी या हॉस्पिटलला भरलेली बिले आणि राशन कार्ड, आधार कार्ड शपथपत्रावर सादर केले. त्यावरही राज्य शासनाने खंडपीठात सांगितले की रुग्णालये उपचार नाकारत असल्यास ही बाब गंभीर आहे. त्या सर्व दवाखान्यांना नोटीस बजावली असून कायद्यानुसार कार्यवाही करू असे सांगितले. त्यानंतर 22 जून 2021 रोजी पुढील सुनावनी ठेवली आहे.

मात्र त्यानंतरही आम्ही आक्षेप नोंदवत खंडपीठाला सांगितले की, योजनेचा लाभ रुग्णांना मिळत नाही, सदर बाब गंभीर आहे. राज्य शासनाने ताबडतोब कार्यवाही करावी. तेव्हा राज्य शासनाने सर्व रुग्णांना मोफत लाभ देण्यात येईल असे सांगितले. तेव्हा खंडपीठाने ही योजना शासनाने खर्‍या अर्थाने राबवावी. राज्यातील एकही रुग्ण केवळ आर्थिक कारणामुळे उपचार मिळाले नाहीत, असा राहू नये. याची काळजी राज्य शासनाने घ्यावी. त्यानंतरही खंडपीठाला आम्ही पुन्हा आक्षेप घेतला की योजनेतील लाभार्थ्यांकडून लाखो रुपयांची बीले हॉस्पिटलने घेतलेली आहेत. त्यावर खंडपीठाने जिल्हाधिकार्‍यांना आदेश दिले की कोविड रुग्णांना लाभार्थी असुनही मोफत उपचार मिळाला नाही असे रुग्ण त्यांची तक्रार राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीकडे सादर करावी. या समितीने तक्रारींचे निराकरण करावे असे आदेशात म्हटले आहे.

रुग्णालयाला बील भरलेल्यांनी काय करावे?
पांढर्‍या, पिवळ्या आणि केशरी शिधा पत्रिका असलेल्या रुग्णांनी या योजनेच्या हॉस्पिटलमध्ये कोविड काळात उपचार घेतलेले असतील तर त्या रुग्णांनी सोबतच्या नमुन्याप्रमाणे जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज करावेत. अर्जासोबत तुमच्याकडे असलेली पिवळी, पांढरी किंवा केशरी शिधापत्रिकेची झेरॉक्स जोडावी. सोबत रुग्णालयाला बील भरलेल्या पावत्या, रुग्णाचे आधार कार्ड जोडावे. हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळतात म्हणून अनेकजण तिथे दाखल झाले. मात्र इथे वेगवेगळी कारणे देऊन रुग्णांकडून बील वसूल करण्यात आले. रुग्णांनी भरलेले हे बील आपण खंडपीठाच्या आदेशाप्रमाणे संबंधीत हॉस्पिटल किंवा शासनाकडून वसूल करणार प्रक्रीया करीत आहोत. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास अर्ज केल्याची पोचपावती आणि अर्जाचा संपूर्ण झेरॉक्स सेट आम्हाला दिंद्रूड (ता.माजलगाव जि. बीड) येथे आणून द्यावा, किंवा दैनिक कार्यारंभ कार्यालय, कार्यारंभ भवन, धानोरा रोड, बीड येथे बालाजी मारगुडे यांच्याकडे देखील आणून द्यावा, असे अवाहन ओमप्रकाश शेटे यांनी केले आहे. शिवाय हाच फॉर्म्यूला प्रत्येक जिल्ह्यात राबविला जावा, त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, काही अडचण आली तर संपर्क करावा, असे अवाहन करण्यात येत आहे.

बीड जिल्ह्यात 623 खाटा
या योजनेंतर्गत जिल्ह्यात 623 खाटा आहेत. मात्र या खाटावर आज रोजी केवळ 35 रुग्णांवर या योजनेतून उपचार होत आहेत. जिल्ह्यातील 18 रुग्णालयात ही योजना लागू आहे.

महत्मा फुले जनआरोग्य योजनेत असलेली हॉस्पिटल
1) घोळवे हॉस्पिटल बीड
2) काकू-नाना मेमोरिअल हॉस्पिटल बीड
3) कराड हॉस्पिटल बीड
4) लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी सर्जिकल हॉस्पिटल बीड
5) माणिक हॉस्पिटल बीड
6) मुंडे चिल्ड्रन हॉस्पिटल बीड
7) पॅराडाईज हॉस्पिटल बीड
8) प्रशांत हॉस्पिटल बीड
9) साबळे हॉस्पिटल माजलगाव
10) साठे सर्जिकल हॉस्पिटल
11) सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर हॉस्पिटल बीड
12) श्रेया हॉस्पिटल
13) शुभदा हॉस्पिटल बीड
14) स्पंदन हॉस्पिटल, बीड
15) तिडके हॉस्पिटल, बीड
16) वीर हॉस्पिटल, बीड
17) विठाई हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर बीड
18) यशवंतराव जाधव मेमोरिअल हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर बीड
19) योगिता नर्सिंग होम अ‍ॅन्ड बाल रुग्णालय केज
20) कृष्णा हॉस्पिटल बीड
21) श्री संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल
22) जिल्हा रुग्णालय बीड
23) मातोश्री हॉस्पिटल बीड
24) आष्टी ग्रामीण रुग्णालय
25) माजलगाव ग्रामीण रुग्णालय
26) परळी सरकारी रुग्णालय
27) गेवराई सरकारी रुग्णालय
28) केज सरकारी रुग्णालय
29) एसआरटी मेडिकल कॉलेज अंबाजोगाई
30) स्त्री रुग्णालय गेवराई
(हॉस्पिटलची राज्यभरातील पीडीएफ यादी देखील खाली जोडली आहे ती पहा)

बीडमध्ये मदत मिळविण्यासाठी संपर्क करा
या योजनेतून तुम्हाला मदत न मिळाल्यास सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यात पगारदार समन्वयक नेमण्यात आलेले आहेत. बीड जिल्ह्यासाठी 08275095874 हा संपर्क क्रमांक असून हॉस्पिटलकडून अडवणूक झाल्यास तुम्ही यांची मदत घेऊ शकतात. शिवाय या योजनेच्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये सरकारकडून आरोग्य मित्रांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या हॉस्पिटलमध्ये आरोग्य मित्र कोण असे तुम्ही हॉस्पिटलच्या डॉक्टरांना विचारू शकता व मदत मागू शकता.

जिल्हाधिकार्‍यांकडे करावयाच्या अर्जाचा नमुना पहा…

योजनेत नमुद आजार, सरकारने ठरवून दिलेले पॅकेज पहा

ओमप्रकाश शेटे यांच्या याचिकेवरील हायकोर्टाचे आदेश पहा….

Tagged