arrested criminal corona positive

सोनार खून प्रकरणातील मुख्य आरोपी एलसीबीने केला नाशिकातून जेरबंद!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा शिरूर

शिरुर : येथील सराफा व्यावसायीक विशाल कुल्थे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीस मंगळवारी (दि.1) पहाटे नाशिक येथून ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.भारत राऊत यांनी केली. यामध्ये त्यांना नाशिक पोलिसांनी मोठी मदत केली.

शिरुर येथील विशाल कुल्थे या सराफा व्यापार्‍याचे अपहरण करुन त्याचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील मास्टर माईंड ज्ञानेश्‍वर गायकवाड आणि त्याचे साथीदार धीरज मांडकर व केतन लोमटे यांची नावे समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांना शिरुरच्या न्यायालयाने 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. तर यातील मुख्य आरोपी ज्ञानेश्‍वर उर्फ भैय्या गायकवाडचा पोलीस शोध घेत होती. अखेर मंगळवारी पहाटे नाशिक येथून त्यास ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजा रामस्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख भारत राऊत व त्यांच्या टीमने केली. यामध्ये त्यांना नाशिक पोलिसांची मदत मिळाली.

Tagged