मराठा आरक्षणाचा कोल्ड ब्लडेड मर्डर केला; कु-कृत्यांचे रेकॉर्ड तोडले

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

मुंबई : मराठा आरक्षणाचा ठाकरे सरकारने कोल्ड ब्लडेड मर्डर केला, अक्षरशः मुडदा पडला आहे. तसेच, कु-कृत्यांचे सर्व रेकॉर्ड तोडले अशी जहरी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. बीडमध्ये पत्रकारांशी बुधवारी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आ.सुरेश धस, आ.लक्ष्मण पवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, प्रा.देविदास नागरगोजे आदी उपस्थित होते.

राज्य सरकारने मराठा समाजाला 3 हजार कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज द्यावे अशी मागणी त्यांनी केली. मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास गटातून (EWS) आरक्षण मिळेल असा निर्णय महाभकास आघाडीने घेतला. ही आघाडी कर्तव्यशून्य आहेच, पण कर्तृत्वशून्य हा त्यांचा परिचय आहे. आता कर्तृत्व परावलंबी आहेत हे सिद्ध झाले. कारण 10 टक्के EWS आरक्षण दिले, त्यात ठाकरे सरकारचं कर्तृत्व काय? ते मोदी सरकारने दिले आहे. त्यामुळे हे ठाकरे सरकार कर्तृत्वावरही परावलंबी आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केला. आम्हाला इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला नख न लावता पूर्ण आरक्षण हवं आहे, ते मिळविण्यासाठी आम्ही लढा देत राहू असे शेलार म्हणाले. तसेच, नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण धोक्यात घातले आहे. इंग्रजाप्रमाणे समाजात तेढं निर्माण करण्याचं काम केले आहे. इंग्रजांप्रमाणे आता महाविकास आघाडी सरकारला चले जावं म्हणत आहोत, असा हल्ला भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

५ जूनच्या मोर्चाला पाठिंबा : शेलार
आ.विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या मोर्चासह मराठा आरक्षण समर्थनार्थ कुठल्याही आरक्षण मोर्चास भाजप विरहीत पाठींबा आहे. आम्ही कोणत्याही संघटनेला पाठींबा देऊ असे शेलार यांनी स्पष्ट केले.

Tagged