बीड जिल्हा : आज कोरोना रुग्णसंख्या तीनशेच्या घरात

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

प्रत्येक दिवशीच्या तपासण्यांचे प्रमाणही कमी

बीड : जिल्ह्यात गुरुवारी (दि.३) कोरोनाचे ३२२ रुग्ण आढळून आले आहेत. जवळपास सर्वच तालुक्यातील संसर्ग कमी होताना दिसून येत आहे.

जिल्ह्यातून बुधवारी ३३१० जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.३) प्राप्त झाले, त्यामध्ये ३२२ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर २९८८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात ७४, अंबाजोगाई १६, आष्टी ६०, धारूर २८, गेवराई ३३, केज २५, माजलगाव २२, परळी ४, पाटोदा १७, शिरूर २८ तर वडवणी तालुक्यात १५ रुग्ण आढळून आले. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होताच नागरिकांनी मास्कचा वापर कमी केला आहे.

Tagged