gharfodi, chori

धारूरमध्ये दुसऱ्या दिवशीही चोरी, शस्त्राने महिलेवर वार

क्राईम धारूर न्यूज ऑफ द डे

किल्ले धारूर/ सचिन थोरात

धारूर शहरात सलग दुसऱ्या दिवशी चोरीची घटना घडली आहे.येथील आझादनगर भाग असलेल्या परिसरात पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने घरात घुसत धारदार शस्त्राने महिलेवर वार करत चोरी केल्याची घटना घडली आहे.महिलेस पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वराती येथे पाठवण्यात आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेखा धस करत आहेत.

शहराच्या जवळच असणाऱ्या चिंचपूर रोड येथे असणाऱ्या एका आश्रमात सोमवारी रात्री चोरट्यांनी चोरी केल्याची घटना ताजी असताना आणि या प्रकरणाचा तपास सध्या पूर्ण झाला नसताना शहरातील आझादनगर भागात बुधवार रोजी पहाटेच्या सुमारास जबरी चोरीची घटना घडली आहे.याठिकाणी चोरीसाठी आलेल्या चोरट्यांनी धारदार शस्त्र घेऊन घरात प्रवेश करत महिलेवर शस्त्रांनी वार करत चोरी केली आहे.या महिलेस धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचारासाठी पाठवण्यात आले आसता आवश्यक असणाऱ्या पुढील उपचारासाठी या महिलेस अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत जात असल्याने धारूरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंद झाला नसला तरी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.या घडलेल्या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुरेखा धस या करत आहेत

Tagged