accident

दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

आष्टी क्राईम न्यूज ऑफ द डे

आष्टी दि.29 : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकी चालकांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आष्टी तालुक्यातील धानोरा येथे हिवरा रोडवर गुरुवारी (29 जुलै) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
धानोरा-हिवरा रोडवर धोंडे कॉलेज जवळ हा भिषण अपघात झाला. वाळके वस्ती, सुलेमान देवळा येथील एकनाथ घोडके व त्यांच्या पत्नी संगीता घोडके हे त्यांच्या बॉक्सर दुचाकीवरून (एमएच 14 वाय 6252) धानोर्‍याकडे येत होते. यावेळी समोरून येत असलेल्या पल्सर (एमएच 12 क्यूपी 4359)) सोबत त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये बॉक्सर चालक एकनाथ घोडके व पल्सर चालक गणेश भोसले हे दोघेही जागीच ठार झाले तर संगीता घोडके या गंभीर जखमी झाल्या. भरधाव वेगात दुचाकी पळवणार्‍यांवर कोणाचाही वचक राहीला नसून या प्रकारांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Tagged