लोकेशन बॉयसह अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा जप्त!

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे बीड

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची कारवाई
गेवराई दि.26 : सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी अवैध धंद्यावर करवाईचा धडाका सुरू केला आहे. गेवराई तालुक्यातील म्हाळस पिंपळगाव येथे गोदापात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन हायवा पकडल्या, तसेच यावेळी लोकेशन देणाऱ्यांना त्यांच्या वाहनासह ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईने वाळू माफियामध्ये खळबळ उडाली आहे.
25 नोव्हेंबर रोजी रात्री सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गेवराई हद्दीतील म्हाळस पिंपळगाव नदीमधून अवैध वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्वतः पंकज कुमावत व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास म्हाळस पिंपळगाव फाट्यावरून लोकेशन देणारे तीन इसम, एक कार ताब्यात घेतली. तसेच वाळू भरण्यासाठी उपयोगात येणारे ट्रॅक्टर लोडर व दोन हायवा ताब्यात घेतले. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी हजर केले आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सपोनि संतोष मिसले, उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, मारुती माने, पोलीस हवालदार बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर ,विकास चोपणे, महादेव सातपुते रामहरी बंडाने, दिलीप गीते, सचिन आहकारे, राजू वंजारे, मतीन शेख हुंमबे, चालक सफो यादव, यांनी केलेली आहे.

Tagged