पंकज कुमावतांच्या पथकाचा छापा; 19 मटकाबहाद्दर ताब्यात!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव

बीड दि.5 : सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचा अवैध धंद्यावर जिल्हाभरामध्ये कारवाईचा धडाका सुरुच आहे. बुधवारी (दि.5) दुपारी माजलगाव शहरामध्ये मटका व ऑनलाईन लॉटरी घेणार्‍या अड्ड्यावर धाड टाकली. दोन्ही कारवाईत लाखाचा मुद्देमाल जप्त करत माजलगाव शहर पोलीस ठाण्यात 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई माजलगाव शहरात खळबळ उडाली आहे.

माजलगाव शहरातील वडरवाडा येथील जुनी नगरपालिका समोर गोरख वडर यांच्या मोकळ्या जागेतील पत्र्याच्या शेडच्या बाजूला मटका मालक शेख इर्शाद व इतर काही कल्याण मटका जुगाराचा खेळ खेळत आहे. तसेच पिलाजी शिंदे यांचे घराशेजारी पत्र्याच्या शेडमध्ये तोपिक सय्यद विनापरवाना बेकायदेशीर राजश्री लुटो ऑनलाईन लॉटरी जुगार खेळवीत आहे. या माहितीवरुन सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.संतोष मिसळे व टिमने दोन्ही ठिकाणी बुधवारी दुपारी छापा मारला. यावेळी 12 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा एकूण 67 हजार 60 रुपये जप्त केले. 12 जणांसह मुळ मालक असे 19 जणांवर पोह.बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर राजश्री ऑनलाइन लॉटरी येथून 47 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकूण चौघांवर पोना.दिलीप गीते यांच्या फिर्यादवरुन माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेहरकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.संतोष मिसळे, पोह.बालाजी दराडे, पोना राजू वंजारे, दीलीप गिते, शेख पाशा, दीपक जावळे यांनी केली.

Tagged