corona

जिल्ह्यात कोरोना शंभरपार!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.15 : देशासह राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. मात्र त्याचबरोबर बीड जिल्ह्यातही बांधितांची आकडेवारी वाढताना दिसत आहे. रविवारी (दि.16) जिल्ह्यात 125 नवे कोरोना बाधित आढळून आले. रोजच्या संख्येनुसार हा आकडा हळूहळू वाढतच आहे.

जिल्ह्यात एकूण 1 हजार 814 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. रविवारी सकाळी आलेल्या अहवालात 1 हजार 689 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर 125 जण पॉझिटिव्ह आले. यामध्ये अंबाजोगाई 24, आष्टी 9, बीड 23, धारूर 3, गेवराई 8, केज 3, माजलगाव 10, परळी 26, पाटोदा 10, शिरुर 5, वडवणी 4 असे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात उपचार घेणार्‍यांची संख्या 442 वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.

Tagged