बहीण -भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी

परळीजवळील जिरेवाडी शिवारातील घटना

परळी : शहराजवळील जिरेवाडी शिवारात वृद्ध बहीण -भावाची दगडाने मारून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी परळी ग्रामीण पोलिसांनी भेट दिली मात्र दुपारपर्यंत हत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

जिरेवाडी शिवारात नदीलगत सटवा ग्यानबा मुंडे (रा.जिरवाडी, वय ६८) यांचे शेत आहे. याच शेतात त्यांच्या बहीण शुभ्रा ग्यानबा मुंडे (वय ७०) त्यांच्याकडे राहत असत, या दोघा बहीण-भावाची दगडाने ठेचून मारून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळी जिरेवाडी ग्रामस्थ घटनास्थळी जमले असून परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी ही पोहोचलेले होते. नेहमी शांत असलेल्या जिरेवाडी परिसरात बहीण -भावांची निर्घृण हत्या झाल्याने जिरेवाडी गाव हादरले आहे.

Tagged