crime

मस्जीदची जमीन हडपणार्‍या तात्कालीन उपजिल्हाधिकारी बोधवडवर गुन्हा दाखल!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव

दिंद्रूड पोलीस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा

बीड दि.8 ः माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथे मस्जिदची वक्फ बोर्डाच्या ताब्यातील 44 एकर 8 गुंठे जमीन बेकायदेशीरपणे स्वतःच्या नावे केली. या प्रकरणी दिंद्रूड पोलीस ठाण्यात जिल्हा वक्फ बोर्ड अधिकार्‍याच्या फिर्यादीवरुन मंगळवारी (दि.8) तात्कालीन उपजिल्हाधिकार्‍यांसह दहा जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवस्थान, मस्जिदच्या जमीनी बेकायदेशीरित्या हडपण्याचे प्रकार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडत असून नवनवीन प्रकार उघडकीस येत आहोत. नित्रुड येथील घटनेत गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्हा वक्फ बोर्ड अधिकारी अमीनुजमा खलीखुजमा सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथे मस्जितीची व वक्फ बोर्डच्या मालकीची इनाम जमीन सर्व्हे नंबर 36, 37 मध्ये क्षेत्र 44 एकर 8 गुंठे आहे. त्याची नोंद महाराष्ट्र राजपत्रात 14 फेबु्रवारी 1974 अन्वेय नोंद असून महसुल अभिलेखात खीदमत मास इनाम जमीन म्हणून नोंद आहे. असे असतानाही तत्कालीन उपजिल्हाधिकारी अभिमन्य बोधवड यांनी 31 मार्च 1982 रोजी बेकायदेशीररित्या हैद्राबाद इनाम निर्मुलन कायद्यांतर्गत खालसा करण्यात आलेली आहे. आरोपींनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी वक्फ बोर्ड यांचे बनावट नाहरकत प्रमाणपत्र बनवून खिदमत माश इनाम जमीन खरेदी विक्री करण्यात आली. तसेच फेरफारमध्ये स्वतःच्या नावे नोंद करुन घेतली. या पक्ररणी प्रदिप विश्वनाथ आघाव, बिभिषन रंगनाथ बोधवड, रंगनाथ बापुराव बोधवड, अभिमन्यु रंगनाथ बोधवड, अनुसया विश्वनाथ निरडे, शितल गणेश इरमले, स्नेहल अभिमन्यु बोधवड, सय्यद रज्जाक सय्यद जाफर, सय्यद रईस सय्यद जाफर, प्रशांत उत्तमराव तोष्णीवाल यांच्यावर दिंद्रूड पोलीस ठाण्यात कलम 420, 406, 467, 468, 471, 447, 448, 120 (ब), 34, 409 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Tagged