पोलिसांच्या बदल्याची यादी जाहीर!

बीड : जिल्ह्यातील विहित कालावधी पूर्ण झालेल्या 350 पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुख्यालय येथे गुरुवारी (दि.30) मुलखती घेण्यात आल्या होत्या. यातील 308 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्याची यादी प्रसिद्ध झाली आहे. तर उर्वरित 42 जणांची यादी कधी प्रसिद्ध होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Continue Reading

मांजरसुंबा घाटात तरुणाचा घातपात?

नेकनूर दि. 29 : येथील मांजरसुंबा घाटात बुलटेवर पडलेल्या अवस्थेत मंगळवारी (दि.29) मृतदेह आढळून आला. तरुणाच्या डोक्याला गंभीर जखम असून हा घात आहे की, अपघात याचा तपास पोलीस करत आहे. घटनास्थळी नेकनूर व बीड ग्रामीणचे पोलीस दाखल झाले आहेत. निलेश ढास (वय 27 रा.लिंबागणेश ता.बीड) या तरुणाचा मांजरसुंबा घाटात मृतदेह आढळून आला आहे. हा अपघात […]

Continue Reading
chhed chhad

विस्तार अधिकारी महिलेची छेडछाड; पतीकडून गटशिक्षणाधिकार्‍याची धुलाई

बीडमधील प्रशिक्षणादरम्यान घडलेला प्रकार बीड : जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकारी यांचे ‘बाला’ या कार्यक्रमाचे प्रशिक्षण बुधवारी बीड शहरातील स्काऊट भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षण कार्यक्रमास येणार्‍या एका महिला विस्तार अधिकार्‍याची तिच्या पतीसमोर एका गटशिक्षणाधिकार्‍याने रस्त्यात दोन ते तीन वेळा छेडखानी केली. त्यानंतर चिडलेल्या पतीने संबंधीत गटशिक्षणाधिकार्‍याची चांगलीच धुलाई केल्याचे वृत्त […]

Continue Reading
hrct scan

बीडमध्ये सिटी स्कॅन स्कोर वाढविणारं रॅकेट?

अबबऽऽऽ जिल्हा रुग्णालयात स्कोअर तीन अन् खासगी लॅबचा दहा केशव कदम/ बीड माणसं मारायचा अन् लुटायचा धंदा टाकलाय का? वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर आणि ‘कार्यारंभ’ने केला भांडाफोड जिल्हाधिकार्‍यांकडून चौकशीचे आदेशदि.30 : अ‍ॅन्टीजेन आणि आरटीपीसीआरचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी लोक सर्रास सिटीस्कॅन करून आपला एचआरसीटी चा स्कोर तपासून आपल्याला कोरोना झाला आहे किंवा नाही याची खात्री […]

Continue Reading
amarsinh pandit

अमरसिंह पंडित गेवराईत उभारणार 200 खाटाचे कोविड केअर सेंटर

गेवराई : कोविड पॉझिटीव्ह रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात खाटा मिळत नसल्याच्या अनुषंगाने गेवराई तालुक्यात 200 खाटांचे कोविड केअर सेंटर आरोग्य विभागाच्या मदतीने सुरु करणार असल्याची माहिती माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी दिली. पुढील आठवड्यात पहिल टप्यात 100 खाटांचे कोविड केअर सेंटर कार्यान्वीत होणार असून या ठिकाणी 20 बेडसाठी ऑक्सीजनची सुविधा सुद्धा उपलब्ध करणार आहे.यावेळी तहसिलदार सचिन […]

Continue Reading
corona testing lab

बीड जिल्हा : कोरोनाच्या रुग्णांचा उच्चांक

बीड – बीडमध्ये कोरोना रुग्णांचा दिवसेंदिवस उच्चांक होत आहे. शनिवारी प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालात 764 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर करण्यात आले. आज प्रशासनाला एकूण 6140 अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 5376 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.तालुकानिहाय अहवाल पुढील प्रमाणे….

Continue Reading
CORONA

बीड जिल्हा : कोरोनाच्या रुग्ण संख्येत आजही चिंताजनक वाढ

बीड, दि.9 : कोरोनाच्या रुग्णसंख्येत शुक्रवारीही चिंताजनक वाढ झालेली पहायला मिळाली. आजही 732 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. आरोग्या विभागाने आजा एकूण 6496 नमुने तपासले होते. त्यात 5764 रुग्ण निगेटिव्ह आढळले आहेत.तालुकानिहाय पॉझिटिव्ह आढळलेल्यांची रुग्णसंख्या पुढील प्रमाणे…

Continue Reading
collector jagtap

‘या’ आवश्यक सेवांना मिळाली परवानगी

जिल्हा प्रशासनाच्या आदेश बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ४ एप्रिल रोजी ‘ब्रेक दि चेन’च्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा उल्लेख होता, त्यात आणखी काही सेवांचा समावेश सोमवारी राज्य सरकारने केला आहे. त्याअनुषंगाने आज (दि.६) जिल्हा प्रशासनाकडून आदेश आले आहेत. या आवश्यक सेवांना मिळाली परवानगी पेट्रोल पंप, पेट्रोलियम संबंधित उत्पादने,सर्व प्रकारच्या कार्गो सेवा,डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस […]

Continue Reading
gents parlour

वर्षभरात सहा महिने बंद; सलून व्यवसायिकांनी जगायचं कसं?

बीड : कोरोनाच्या काळात सर्वाधिक फटका बसलेल्या वर्गात सलून व्यवसायिकांचा समावेश होतो. मागील वर्षभराच्या काळात तब्बल 6 महिने सलून व्यवसायिकांनी कडकडीत बंद पाळला. जेव्हा अनलॉक करण्यात आले त्यानंतरही कोणी सलूनमध्ये जाण्यास धजावत नव्हता. आता कुठे त्यांचा व्यवसाय पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत त्यांची वाताहत होऊ लागली आहे. सलून व्यवसायिकांचे हातावर पोट असल्याने त्यांनी […]

Continue Reading

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने तहसीलदारांच्या गाडीला दिली धडक

बीड दि. 6 : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने तहसीलदार यांच्या गाडीला धडक दिली. ही घटना मंगळवारी (दि.6) सकाळी घडली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून अन्य एक फरार आहे. बीड तालुक्यातील ढेकनमोहा परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर तहसीलदार शिरीष वमने यांनी अडविला. मात्र ट्रॅक्टर चालकाने थेट तहसीलदार यांच्या गाडीला ट्रॅक्टरची धडक दिली. या […]

Continue Reading