corona

अरे बापरे… बीड जिल्ह्यात आज आढळले इतके पॉजिटिव्ह

बीड: बीड जिल्ह्याचा कोरोना पॉजिटिव्हचा एकदा दररोज वाढताना दिसत आहे. आज थोडे थोडके नव्हे तर तब्बल 80 जणांचा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्याची चिंता वाढली आहे.आज पॉजिटिव्ह आलेल्यामध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक 37 जणांचा समावेश आहे. तर त्या पाठोपाठ अंबाजोगाई तालुक्यातील 15 जण आहेत.संपुर्ण जिल्ह्यात पॉजिटिव्ह आलेले पुढील प्रमाणे…

Continue Reading
corona

बीड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढला

बीड- जिल्ह्यात कोरोना covid 19 रुग्णांची संख्या आता वाढताना दिसत आहे. मागील पंधरा दिवस जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 50 च्या आत आलेला होता. शनिवार दि.20 फेब्रुवारी रोजी हा आकडा 58 वर जाऊन पोहोचला आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी आजचा अहवाल प्रसिध्दीस दिला आहे. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकार आणि प्रशासन दोघेही चिंतेत […]

Continue Reading
avkali paus

अवकाळीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा -धनंजय मुंडे

परळी- गेल्या दोन दिवसात बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे काढणीस आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असून, या नुकसानीचे महसूल व कृषी विभागामा़र्फत तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.गेल्या दोन दिवसात बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही तुरळक ठिकाणी […]

Continue Reading
ACB TRAP

37 हजारांची लाच घेताना बीडीओ पकडला

बीड दि.17 : बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 37 हजारांची लाच घेताना बीडोओला रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.17) सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.     पाटोदा व बीड येथील बीडीओ नारायन मिसाळ यांना 37 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. मिसाळ यांनी तक्रारदाराकडे विहिरीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी […]

Continue Reading
ACB TRAP

आष्टी तहसील कार्यालयात एसीबीची कारवाई

बीड  ः आष्टी येथील तहसील कार्यालयात एसीबीने सोमवारी (दि.8) कारवाई केली. या प्रकरणी आष्टी पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अजिनाथ मधुकर बांदल (वय 41) असे लाचखोर अव्वल कारकुनाचे नाव आहे. त्यांनी तक्रारदारास स्वस्त धान्य दुकानाचे परवाना नुतनीकरण करण्यासाठी पाच हजाराची लाच मागितली होती. सदरील लाच स्विकारताना तहसील कार्यालयातील अजिनाथ बांदल यास रंगेहाथ पकडले. […]

Continue Reading

‘डॉन’ने घेतला अखेरचा श्वास

बीड दि.6 : बीड पोलीस दलातील श्वान ‘डॉन’ ने शनिवारी (दि.6) सकाळी अखेरचा श्वास घेतला. डॉन हा एक वर्षांपूर्वी निवृत्त झाला होता. त्याने पोलीस दलात उल्लेखनीय कार्य बजावलेले आहे. मागील सहा महिन्यांपासून तो आजारी होता. आज सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. डॉनचा 11 वर्ष वयाचा होता. डॉनने भोपाळ येथे नॅशनल चॅम्पियन पदक पटकावले होते. योगेश्वरी […]

Continue Reading