MURDER

डोक्यात दगड घालून वृद्धाचा खून

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

कुंबेफळ येथील घटना
केज : एका वाटसरू व्यक्तीने दगडाने ठेचून वृद्ध व्यक्तीचा खून केल्याची खळबळजनक घटना कुंबेफळ (ता.केज) येथे सोमवारी (दि.8) सायंकाळी 4 वाजता उघडकीस आली आहे.

बाबुराव जाडकर (वय 90, रा.कुंबेफळ ता.केज) असे मयताचे नाव आहे. ते सारणी-आनंदगाव रस्त्यालगत असलेल्या खडी क्रेशरजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या त्यांच्या शेतात थांबले होते. त्यावेळी रस्त्याने जात असलेल्या एका वाटसरूने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. बेदम मारहाण झाली, दरम्यान डोक्यात दगड लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार स्थानिकांनी पाहिल्यानंतर पोलिसांना कळविले असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच, मारेकर्‍यास स्थानिकांनी पकडले असल्याची माहिती आहे.

Tagged