beed chouk,

बीडच्या शिवतीर्थावरील रस्ता कामामुळे वाहतूक मार्गात बदल

बीड, दि. 18 : बीडच्या शिवतीर्थावरील रस्ता कामामुळे बार्शी रोडकडून बसस्टँडकडे येणार्‍या वाहनांच्या वाहतूक मार्गात दिनांक 18 जून शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून बीड पोलीसांनी बदल केला आहे. त्यासाठी पोलीसांनी एक प्रेसनोट प्रसिध्दीस दिली आहे. मात्र पोलीसांच्या या प्रेसनोटमुळेच वाहनधारकांची दिशाभूल होण्याची शक्यता अधिक असून वाहतूक कोंडी देखील होऊ शकते. त्यामुळे वाहनधारकांच्या सोईसाठी ‘कार्यारंभ’ काही पर्यायी […]

Continue Reading

नंदकुमार ठाकूर बीडचे नवे एसपी!

बीड दि.8 ः नांदेड येथील नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून बुधवारी (दि.8) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती गृहविभागाच्या आदेशाने करण्यात आली आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे. पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या बदलीनंतर प्रभारी पोलीस अधीक्षक म्हणून पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती. महिन्यापेक्षा […]

Continue Reading

अवैध गर्भपात प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल!

तपासात आरोपींची संख्या वाढणार बीड दि.8 ः गर्भपातादरम्यान रक्तस्त्राव होऊन महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.5) घडली होती. त्यानंतर मयत महिलेच्या पतीसह नातेवाईकांना चौकशीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावले. त्यांनी कबुली देताच त्यांना ताब्यात घेतले, तसेच गेवराई तालुक्यातील अंगणवाडी सेविकेसह सिस्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणी बुधवारी (दि.8) पहाटेच्या सुमारास पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]

Continue Reading
death

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाशेजारी आढळले पिस्टल!

बीड दि.8 ः शहरातील स्वराज्यनगर परिसरामध्ये एका तरुणाचा बुधवारी (दि.8) सकाळी मृतदेह आढळून आला. तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मृतदेहाच्या शेजारीच एक पिस्टल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अक्षय भांडवले (वय 38 रा.बार्शी नाका, बीड) असे मयताचे नाव आहे. त्याचा मृतदेह स्वराज्यनगर येथील मारुती-सुझूकी शोरुमच्या जवळ […]

Continue Reading

पतीने केला पत्नीचा खून; रचला दरोड्याचा बनाव!

बीड दि. 5 : महिलेचा स्क्रूड्रायवरच्या सहायाने गळा दाबून हत्या केल्याची घटना बीड तालुक्यातील रंजेगाव येथे रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. दरोडेखोरांनी हा प्रकार केल्याचे बनाव मयत महिलेच्या पतीने रचला होता. मात्र सगळा प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच महिलेच्या पतीने आपणच हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली. ज्योती दिनेश आबुज (वय […]

Continue Reading

बोगस लायसन्स देणाऱ्या एजंटवर फसवणुकीचा गुन्हा!

बीड उप प्रादेशिक परिवहन विभागाची कारवाईबीड दि.21 : येथील आरटीओ कार्यालयात विविध पक्षाचे, पुढार्‍यांचे कार्यकर्ते येथील यंत्रणेवर दबाव आणून बोगस कामे करत असल्याचे सर्वश्रुत होते. मात्र मागील काही दिवसांपासून आरटीओ विभाग ‘ॲक्शन मूडमध्ये’ आलेला दिसत आहे. बोगसगिरी करणाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल होत आहेत तर दादागिरी करणाऱ्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होत आहे. त्यामुळे […]

Continue Reading
crime

बीड आरटीओ कार्यालयातील पाच एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल!

बीड दि.22 : अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून बनावट कागदपत्रे तयार केल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.22) पाच एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बीड येथे खोटे कागदपत्र सादर करणे, बनावट आरसी तयार करणे, खोट्या स्वाक्षऱ्या करून वाहन हस्तांतरण […]

Continue Reading
r raja

बीडचे एसपी आर. राजा यांची बदली!

बीड : दि.20 बीड जिल्ह्यातील कायदा-व्यवस्था बिघडल्यामुळे पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्याविरोधात लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आज आर. राजा हे रजेवर होते. बुधवारी त्यांच्या बदलीचे आदेश आले असून पुणे शहर पोलीस उपायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येथील रजिस्ट्री कार्यालयातील गोळीबार प्रकरण, तसेच जिल्ह्यातील अवैध धंदे, अवैध वाळू उत्खनन यासंदर्भात […]

Continue Reading

गोळीबार प्रकरण; रवींद्र क्षीरसागर यांना अंतरिम जामीन!

बीडः दि.8 : येथील रजिस्ट्री कार्यालयात शेतीच्या वादातून गोळीबार प्रकरण घडले होते. याप्रकरणी रवींद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर अर्जुन क्षीरसागर यांच्यासह आठ जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दरोड्यासह प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील रविंद्र क्षीरसागर यांनी अटकपूर्व जामिनासाठी बीडच्या सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. बीडच्या रजिस्ट्री कार्यालयात […]

Continue Reading

रवींद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागरांसह आठ जणांवर दरोड्याचा गुन्हा!

बीड दि.26 : येथील रजिस्ट्री कार्यालयात रजिस्ट्रीसाठी आलेल्याना धारदार शस्त्राचा धाक दाखवून कुकरीने हल्ला केला. तसेच पैशाची बॅग लंपास केली. याप्रकरणी रवींद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर आदींसह आठ जनांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्यासह दरोड्याचा शनिवारी (दि.26) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिभा श्रीराम क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राजिस्ट्री कार्यालयात राजिस्ट्रीसाठी […]

Continue Reading