2000 NOTE

2000 च्या नोटा बंद होणार, आरबीआयची माहिती

प्रतिनिधी । मुंबईदि.19 : भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले असल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. 2018-19 मध्येच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी आहे. […]

Continue Reading
sachin muluk

उबाठा सैनिकांनी महाप्रबोधनसाठी मोठा निधी जमा केला, त्या देवाण घेवाणीतून अंधारेंना मारहाण झाली

शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांचा गंभीर आरोप प्रतिनिधी । बीडदि.19 : उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून महाप्रबोधन यात्रेसाठी बीडमधील अधिकारी, कर्मचारी अन् व्यापार्‍यांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे जमा केले. या पैशाच्या देवाण-घेवाणीतून जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव आणि सुषमाताई अंधारे यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की अप्पासाहेब जाधव यांनी अंधारेताईंना दोन कानसुलात लगावल्या. […]

Continue Reading
MESTA

शासनाने 2017 पासून फीसचे पैसे थकवले, मग सांगा विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश द्यायचा कसा?

इंग्रजी संस्थाचालकांचा प्रश्न : सरकार साधे चर्चेलाही तयार नसल्याची संस्थाचालकांची खंत प्रतिनिधी । बीडदि.19 : शासनाने मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा (RTE) आणला खरा, परंतु या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच तयार नाही. या कायद्यांतर्गत प्रत्येक इंग्रजी शाळांना आपल्या शाळेत 25 टक्के मोफत प्रवेश देणे बंधनकारक होते. या मोफत प्रवेशाची फीस केंद्र आणि राज्य सरकार […]

Continue Reading

पैसे घेऊन पद वाटत असल्याने सुषमा अंधारेंना शिवसेना जिल्हाप्रमुखांची मारहाण?

जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधवांनी जारी केला व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी मात्र मारहाणीचा आरोप फेटाळलाप्रतिनिधी । बीडदि.18 : शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव आणि उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांच्यातील मारहाणीवर शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी आपली भुमिका मांडली आहे. ते म्हणाले ‘शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या जो पैसे देईल त्यांना पद वाटत सुटल्या होत्या. माझं पद देखील त्या […]

Continue Reading
appasaheb jadhav

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव अन् उपजिल्हाप्रमुख वरेकर यांच्यात धक्काबुक्की

प्रतिनिधी । बीडदि.18 : ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त होणार्‍या सभा स्टेजची पाहणी करताना ठाकरे गटाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्यात कुठल्यातरी कारणावरून शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्यानंतर गणेश वरेकर यांनी अप्पासाहेब जाधव यांची काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओची काच फोडल्याची घटना घडली. त्यामुळे शिवसेनेतील ठाकरे गटातील अंतर्गत धूसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली […]

Continue Reading

30 लाखांचे सोने घेऊन बंगाली कारागीर फरार, माजलगावात खळबळ

प्रतिनिधी । माजलगावदि.14 : शहरातील शहरातील पाच सराफा व्यापार्‍यांनी दागिन्यांची डिझाईन बनवायला दिलेले सोने बंगाली कारागीराने परत न करता फरार झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. याबाबत सराफ व्यापार्‍यांनीच सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अद्यापही याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आलेली नाही. माजलगाव शहरात जवळपास दीडशे सराफा व्यापारी दुकान आहेत. यातील […]

Continue Reading
ASHOK SHEJUL ATTACK

आ. प्रकाश सोळंके यांचे स्वीय सहायक महादू सोळंके यांना अटक

शेजूळ हल्ला प्रकरणात मोठी घडामोड प्रतिनिधी । अंबाजोगाईदि.27 : माजलगाव भाजपा कार्यकर्ते अशोक शेजूळ यांच्यावर धुलीवंदनाच्या दिवशी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ला प्रकरणात आ. प्रकाश सोळंके यांचे स्वीय सहायक महादू सोळंके यांचा हल्ल्याशी संबंध आढळून आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केली आहे.सुत्रांनी दिलेल्या […]

Continue Reading

ऊसतोड कामगारांच्या ट्रकला माजलगावजवळ अपघात

माजलगाव तेलगाव रोडवरील लहामेवाडी फाट्यावरील घटना माजलगाव – माजलगाव तेलगाव रोडवर लहामेवाडी फाट्या जवळ गुरुवार रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान पाठीमागून आलेल्या दुसऱ्या ट्रक ने कर्नाटक कडून जालना जिल्ह्यातील मंठा येथे जात असलेल्या ऊसतोड कामगारांच्या ट्रकला धडक दिली. या अपघातात २० ते २५ ऊसतोड कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमीवर माजलगाव बीड परभणी औरंगाबाद येथे […]

Continue Reading
ASHOK SHEJUL ATTACK

अशोक शेजुळ हल्ला प्रकरणातील पाचवा आरोपी ताब्यात

बीड/माजलगावअशोक शेजुळ हल्ला प्रकरणातील फरार पाचवा आरोपी विजय शिवाजी पवार यास स्थानिक गुन्हे शाखा बीड च्या कर्मचाऱ्यांनी राजुरी परिसरातून काल रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. धुलीवंदन दिवशी शेजुळ यांच्यावर माजलगावमध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्लात अविनाश बाबासाहेब गायकवाड (वय 26 रा. पुनंदगाव), संदीप बबन शेळके (वय 22) सुभाष बबन करे (वय 26), शरद भगवान […]

Continue Reading
prakash solanke

अशोक शेजुळ हल्ला प्रकरणात आमदार प्रकाश सोळंके मंगला सोळंके रामेश्वर तवानी यांच्यावर गुन्हा दाखल

माजलगाव– भाजपा कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर मंगळवारी धुलीवंदना दिवशी अज्ञात पाच ते सहा जणांनी लोखंडी रॉडने शाहूनगर भागात जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात अशोक शेजुळ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान शेजुळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके त्यांच्या पत्नी मंगलताई सोळंके आणि रामेश्वर टवानी यांच्यासह इतर पाच […]

Continue Reading