धारूर बाजार समितीवर भाजपचे एक हाती वर्चस्व

धारूर न्यूज ऑफ द डे

आ.प्रकाश सोळंके जयसिंग सोळंके यांना धक्का

किल्ले धारूर /सचिन थोरात

धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या 18 जागेच्या निवडणुकीमध्ये तब्बल 17 जागेवर वर्चस्व मिळवत भाजपने कृषी उत्पन्न बाजार समितीवर एक हाती वर्चस्व कायम ठेवले.तर राष्ट्रवादी चा सुपडा साफ झाल्याचं या निवडणुकीच्या निकालावरून पाहायला मिळाले.

धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीत 18 जागांपैकी एक जागा पूर्वीच समोरील छाननी प्रक्रियेत उमेदवार विजयी झाला होता यानंतर 17 जागांच्या झालेल्या निवडणुकीत भाजपने मोठे यश संपादन करत तब्बल 16 जागांवर वर्चस्व मिळवत कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता एक हाती ताब्यात घेतली.या झालेल्या निवडणुकीत सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातील 11 संचालक भाजपचे निवडून आले आहेत ग्रामपंचायतचे 4 संचालक भाजपचेच निवडून आले आहेत, हमाल मापाडी मधील एक तर व्यापारी मतदारसंघातील दोन पैकी एक जागा भाजपच्या ताब्यात आली आहे.केवळ व्यापारी मतदारसंघातील एका जागेवर राष्ट्रवादीला खाते खोलता आल्याने धारूर बाजार समितीच्या झालेल्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीचा सुपडा साफ केल्याचे पाहायला मिळाले.या झालेल्या निवडणुकीत भाजपकडून रमेश आडसकर तर राजाभाऊ मुंडे यांनी पूर्ण निवडणूक यंत्रणा स्वतःच्या हातात घेत निवडणूक प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवले होते तर राष्ट्रवादीकडून प्रकाश सोळंके आणि जयसिंग सोळंके यांची प्रतिष्ठा पनाला लागली होती.

Tagged