बीडमध्ये नियमबाह्य काम करणारा आरटीओ श्रीकृष्ण नकाते निलंबित!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

बीड दि.17 : सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नीळकंठ नकाते हे बीड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे प्रभारी असातना नियमबाह्य पद्धतीने काम केले होते. या प्रकरणी त्यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अवर सचिव यांनी नकातेंवर निलंबनाची कारवाई केली आहे.

बीड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात गैरकारभार झाला होता. यामध्ये नियमबाह्य पद्धतीने बोगस जड मालवाहू वाहनांची नवीन नोंद केली होती. हे प्रकरण बीड जिल्ह्यात चांगलेच गाजले होते. या प्रकरणी नकातेंवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतरही नकाते हे परभणी येथे सहायक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत होते. अखेर परिवहन आयुक्त यांनी त्यांचे निलंबन करावे, याबाबत पत्रव्यवहार केला होता. अखेर 16 मार्च रोजी अवर सचिव भरत लांघी यांनी नकाते यांच्या निलंबनाचे आदेश काढले.

Tagged