corona possitive

एक फौजदार, दोन आरोपी कोरोना पॉझिटीव्ह

कोरोना अपडेट क्राईम न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

बीड ग्रामीण व स्थानिक गुन्हे
शाखेतील रिपोर्ट येणे बाकी

बीड  :  कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने बीड शहर पोलीस ठाण्यातील एक फौजदार, व येथील लॉकमधील दोन आरोपी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. 

      बीड ग्रामीण पोलीसांनी दरोड्याच्या तयारीतील आरोपी पकडले होते. त्यानंतर त्या आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांचे स्वॅब घेण्यात आले. यावेळी यातील एका आरोपीच्या पॉझिटीव्ह रिपोर्ट आला होता. दरम्यान आरोपी बीड शहर पोलीस ठाणे, बीड ग्रामीण पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संपर्कात आल्यामुळे येथील अधिकारी, कर्मचारी, लॉकअपमधील आरोपी यांचे स्वॅब तपसाणीसाठी पाठवले होते. यामध्ये आलेल्या रिपोर्टमध्ये बीड शहर पोलीस ठाण्यातील एक फौजदार, लॉकउपमध्ये असणारे वडमाऊली दहिफळ येथील खून प्रकरणातील दोन आरोपी असे तिघे पॉझिटिव्ह आले आहेत. तर चार जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

Tagged