death

गेवराईत कोरोनाचा आणखी एक बळी

कोरोना अपडेट गेवराई न्यूज ऑफ द डे

बीड : गेवराई तालुक्यातील एका 68 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे सकाळी मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ गेवराई तालुक्यातीलच आणखी एका व्यक्तीचा कोरोनाने बळी घेतला आहे. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

  जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले असून दरदिवशी मृत्यू होत आहेत. कोरोनामुळे आज सकाळी गेवराई शहरातील 68 वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यापाठोपाठ आता तालुक्यातील बागपिंपळगाव येथील आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.  त्यामुळे एकूण मृत्यू संख्या 21 झाली आहे.

Tagged