विषबाधा झाल्यामुळे दहा म्हशी दगावल्या

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव

फुलेपिंपळगाव  :   विषबाधा झाल्यामुळे दहा म्हशी दगावल्याची दुर्देवी घटना माजलगाव येथे घडली आहे.

गुजरात येथील भरवाड कुटूंबीय आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी माजलगावला आले. येथील केसापुरी शिवारामध्ये मागील पंधरा वर्षापासून वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे मुरा, गाई, म्हैस अशी त्यांच्याकडे जनावरे आहेत. शुक्रवार ते बुधवार या दरम्यान एकएक करत त्यांच्या दहा म्हशी दगावल्या. विषबाधा झाल्यामुळे म्हशी दगावल्याचे समोर आले आहे. एक एक म्हशीची किंमत ही लाखाच्या घरात आहे. यामध्ये नऊ ते दहा लाख रुपयांचे भरवाड यांचे नुकसान झाले आहे. या घटनेने भरवाड कुटूंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. घटनेची महिती मिळताच माजलगाव तहसिलदार डॉ.प्रतिभा गोरे यांनी मंडळ अधिकारी मुळाटे यांना पंचनाम्यासाठी पाठवले. म्हशीचे शवविच्छेदनकरुन भरवाड कुटुंबास सरकारकडून मदत करण्यात येईल.

Tagged