sushant singh rajput and riya chakraborti

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे – सर्वोच्च न्यायालय

देश विदेश न्यूज ऑफ द डे

दिल्ली: सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत १४ जून रोजी वांद्र्याच्या त्याच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या मृत्यूला आत्महत्या समजून अनेक तपास झाले; मात्र त्याच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात पाटण्यात तक्रार दाखल केल्यापासून या प्रकरणाला वेगळे वळण आले.

आज सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात मुंबई पोलीस कि पाटणा पोलीस हा वाद बाजूला सारत, सीबीआय कडे हा तपास सुपूर्त केला आहे. या प्रकरणातील हा सर्वात मोठा निर्णय आहे. सुशांत सिंह च्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबीयांसोबतच त्याचे फॅन्स आणि मित्रपरिवार सीबीआय तपासाची मागणी करत होते. मात्र, यात महाराष्ट्र शासन विरोधात असताना दिसत होते. सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने सुद्धा यात सीबीआय तपास व्हावा अशी मागणी सुरवातीला केली होती मात्र, कोर्टात प्रकरण गेल्यावर तिने आपले शब्द फिरवून हा तपास मुंबई पोलिसांनी करावा अशी मागणी केली होती.

सुशांत सिंह चे वकील विकास सिंह यांनी दिलेल्या माहिती नुसार, कोर्टाने हा निकाल देताना इतर कोणताही एफआयआर जो या प्रकरणात दाखल झाला आहे, त्याचा तपास सुद्धा सीबीआय करेल असे स्पष्ट केले आहे. प्रत्येक मुद्यात सुशांत सिंह राजपूत च्या वडिलांची बाजू सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरली आहे. या सीबीआय तपासात मुंबई पोलिसांनी सीबीआयला सर्व मदत करावी असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Tagged