nilesh rane,parth pawar,sanjay raut, aditya thakare

नितेश राणे म्हणतात ‘अब तो बेबी पेंग्विन गयो’ तर पार्थ पवार म्हणतात ‘सत्यमेव जयते’

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र राजकारण

मुंबई, दि.19: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून गेल्या दिड महिन्यापासून उठलेलं वादळ शांत व्हायचं नाव घेत नाही. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण सीबीआयकडे देण्याचा निकाल दिल्यानंतर नितेश राणे आणि पार्थ पवार यांनी ट्विट केले आहे.

आ.नितेश राणे आपल्या ट्टिटमध्ये म्हणतात ‘अब तो बेबी पेंग्विन गयो’ सुशांतच्या मृत्यू प्रकरणी जी काही लपवालपवी होत होती, पुरावे नष्ट करण्याचे वेगवेगळे प्रयत्न केले जात होते, त्या सगळ्यांना आता चाप बसेल. आता खर्‍या अर्थाने न्याय मिळेल असा मला विश्वास आहे. तर तिकडे पार्थ पवार यांना सुशांतसिंह प्रकरणात शरद पवारांनी फटकारल्यानंतरही त्यांनी नव्याने यात ट्विट करून सत्यमेव जयते असे म्हटले आहे. शरद पवारांना जेव्हा सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी पार्थ पवार यांनी केली आहे, असे पत्रकारांनी सांगताच पवारांनी मी पार्थच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत देत नाही, असे म्हणून मोठे वादळ निर्माण केले होते. त्यानंतरही पार्थ यांनी केलेले हे ट्विट पवार घराण्यात काही अलबेल नसल्याचे सुतोवाच आहेत.

इकडे शिवसेनेची बाजू लावून धरणारे सामनाचे कार्यकारी संपादक खा.संजय राऊत यांनी म्हटले की, संपूर्ण निकालपत्र हाती आल्याशिवाय त्याच्यावर मत व्यक्त करणं योग्य नाही. या निर्णयावर राज्याचे महाधिवक्ता, पोलीस आयुक्त बोलू शकतील. पण महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. राज्याची एक मोठी परंपरा आहे. न्याय आणि सत्य यासाठी संघर्ष करणारं हे राज्य आहे. या राज्याने आतापर्यंत कोणाचाही अपमान केलेला नाही. मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं षडयंत्र आहे. त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे तपास केल्याची माहिती आहे. मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा जगभरात आहे. जर आपल्याच राज्यातील राजकारणी त्यांच्याविरोधात बोलत असतील तर ते खच्चीकरण करत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Tagged