कापूस वेचण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा खून

केज क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


केज : दि.30 : तालुक्यातील साळेगाव येथे शेतात कापूस वेचणीसाठी गेलेल्या एका विवाहित महिलेचा सकाळी शुक्रवारी ( दि.10) सकाळी अज्ञात व्यक्तीने शेतात मृतदेह आढळू आला. महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आला असुन पोलीस पुढील तपास करत आहेत.
साळेगाव ता. केज दि.३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. अश्विनी समाधान इंगळे वय २८ वर्ष ही महिला आपल्या दस्तगिराचा माळ नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतात कापूस वेचणीसाठी गेली होती. त्यावेळी तिचा गळ्यातील स्कार्फने गळा आवळून व दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. जीवे मारल्या नंतर प्रेत शेजारच्या कापसाच्या शेतात टाकले होते. प्रेताजवळ दगड, स्कार्फ पडलेला असून प्रेतापासून काही अंतरावर वेचुन ठेवलेला कापूस, विळा, जेवणाचा डब्बा, गुटख्याची रिकामी पुडी, पायतील एक बूट व दुसरा काही अंतरवावर कानातील एक दागिना हेअर पिन असे पडलेले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, उपनिरीक्षक श्रीराम काळे, पोलीस उपनिरक्षक दादासाहेब सिद्धे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील तपासणी पथक, आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Tagged