नेकनुरहून कांदा घेऊन गेलेल्या टेम्पोला अपघात; तिघांचा मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र
  • टायर फुटल्याने तुळजापूर जवळ घडली घटना
     नेकनुर दि.16 : सोलापूरकडे कांदा घेऊन निघालेल्या टेम्पोचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो रस्ता दुभाजकाला धडकला. या अपघातात नेकनूर परिसरातील तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात उस्मानाबाद सोलापूर महामार्गावर तुळजापूरजवळ आराधवाडी शिवारात बुधवारी (दि.16) पहाटे दिड वाजताच्या सुमारास झाला.
    नेकनूरपासून काही अंतरावर असलेल्या निवडूंगवाडी गवळवाडी येथील तीन शेतकरी आपला कांदा एकत्रित करून तो सोलापूरच्या बाजाराला टेम्पो (क्र. एम.एच. 16 ए.ई. 7704) यामध्ये घेऊन जात होते. रात्री दिड वाजण्याच्या सुमारास टेम्पोचे टायर फुटल्याने टेम्पो तुळजापूरच्या घाटात डिवायडरवर जोरात धडकला. यात चालक शेख सज्जाद सकलेन (वय 40, रा. नेकनूर) देवराव धोंडीराम शिंदे (वय 55 रा. गवळवाडी नेकनूर), मोहन भगवत मुंडे (वय 45, रा. निवडूंगवाडी) हे तिघे ठार झाले तर भागवत शिवाजी मुंडे (वय 40, रा. निवडूंगवाडी) हे गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना उस्मानाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती नेकनूर आणि निवडूंगवाडी येथील नागरिकांना झाल्यानंतर अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या दुर्दैवी घटनेने नेकनूर, निवडूंगवाडी, गवळवाडी येथे शोककळा पसरल आहे. दरम्यान मयत चालक नेकनूर येथील असून आपल्या मनमिळावू स्वाभाने ते सर्वत्र परिचीत होते. त्यांच्या अपघाती निधनामुळे नेकनूर येथील व्यापार्‍यांनी बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली.
Tagged