mansoon

खुशखबर : मान्सूनने संपूर्ण केरळ व्यापला

देश विदेश शेती

पुणे : शेतकऱ्यांसाठी यंदा आनंदाची बातमी आहे. मान्सूनने अगदी वेळेवर हजेरी लावली असून गुरुवरपर्यंत त्याने संपूर्ण केरळ व्यापला आहे. तसेच कर्नाटक राज्याची संपूर्ण किनारपट्टी व्यापत कारवार, हसन पर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. मान्सूनचे वारे जवळपास गोव्याच्या प्रवेशद्वारावर पोचले आहे. रविवारपर्यंत (दि.७) कर्नाटक, तामिळनाडूच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होण्यास पोषक स्थिती निर्माण आहे. अरबी समुद्रात असलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे वाऱ्यांना खेचून आणल्याने मान्सून नियमित वेळेवर १ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सूनने सोमवारीच केरळच्या कन्नूर, तामिळनाडूच्या कोईम्मतूर, कन्याकुमारीपर्यंत भाग व्यापला होता. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत जाताना किनारपट्टीलगत मान्सूनने आणखी वाटचाल केली आहे. गुरुवारी केरळ, कोमोरीनचा सर्व भाग, श्रीलंका व दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, कर्नाटकसह आणि मध्य अरबी समुद्राच्या काही भागात मान्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. निसर्गमुळे मान्सून वाऱ्यावर प्रभाव पडलेला आहे.

Tagged