गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची बदनामी प्रकरणी परळीच्या तरुणाला अटक!

क्राईम देश विदेश न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र

बीड दि.31 : सोशल मीडियावर गुजरातचे मुख्यमंत्री यांच्याबद्दल 15 महिन्यांपूर्वी बदनाकीकारक पोस्ट केली होती. या प्रकरणी गुजरात सायबर पोलीसांनी परळी शहरातील तरुणास अटक केली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

फैसल खान युसूफझाई (वय 20 रा.परळी) असे आरोपीचे नाव आहे. त्याची परळीत मोबाईल शॉपी आहे. त्याने 15 महिन्यापूर्वी म्हणजे 2020 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल कोविड संदर्भात सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट केली होती. या पोस्टची गंभीर दखल घेत अहमदाबाद शहर सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक केके मोदी यांनी फैसल खान युसुफझाई विरोधात तक्रार दाखल केली होती. 18 एप्रिल 2020 रोजी आयपीसीच्या कलम 505 (1) अन्वये जनतेला भीती किंवा भीती निर्माण करण्याच्या हेतूने, किंवा जनतेच्या कोणत्याही वर्गाला, ज्याद्वारे कोणत्याही व्यक्तीला प्रेरित केले जाऊ शकते या उद्देशाने आयपीसीच्या कलम 505 (1) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. राज्य किंवा सार्वजनिक शांततेविरूद्ध गुन्हा याशिवाय, आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या संबंधित कलमही त्यावर लावले होते. गुरुवारी (दि.22) अहमदाबाद सायबर पोलिसांच्या पथकाने बीड जिल्ह्यात दाखल होत युवकाला नोटीस बजावली. त्याला चौकशी अधिकारी आणि सायबर निरीक्षक एमएन देसाई यांच्यासमोर शनिवारपूर्वी उपस्थित राहण्यास सांगितले. त्यानुसार तरुणांनी अहमदाबाद सायबर पोलीस स्टेशन गाठले आणि आत्मसमर्पण केले. उपनिरीक्षक मोदी म्हणाले, तरुणाने तपास अधिकार्‍यासमोर आत्मसमर्पण केल्यानंतर त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आणि त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

Tagged