कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू;एक गंभीर

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


बीड दि.25 : धुळे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवर शनिवारी (दि.25) सकाळी कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोसले व अन्य एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिवसेना अंगणवाडी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष दिलीप भोसले, महेंद्र गायकवाड हे या अपघातात जागीच ठार झाले तर हे कांबळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी (दि.25) सकाळी कारने (एमएच-23 5277) अंबाजोगाई येथून बीडकडे येत असताना धुळे-सोलापूर राष्ट्रीय मार्गावरील बीड बायपास रोडवर हा अपघात झाला. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे , पोलीस कर्मचारी चव्हाण आनंद मस्के आदींनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले तसेच दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tagged