mahila sarpanch sicide

महिला सरपंचाची विष घेऊन आत्महत्या

खान्देश न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

दि. 24 : महिला सरपंचानं आपल्या राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर, महिला सरपंचाच्या पतीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात दाखल केलं असता, वैद्यकीय अधिकार्‍यांनी महिला सरपंचास मृत घोषित केलं आहे. ही धक्कादायक घटना निफाड तालुक्यातील मरळगोई (खु) येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पतीसह सासरच्या तिघांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


योगीता अनिल फापाळे असं आत्महत्या करणार्‍या महिलेचं नाव असून त्या मरळगोई (खु.) गावच्या सरपंच होत्या. याप्रकरणी मृत योगिता यांचा भाऊ संतोष शांताराम गवळी यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी, पती अनिल बाबासाहेब फापाळे, सासरे बाबासाहेब फापाळे, सासू सरला फापाळे आणि दीर प्रदीप फापाळे यांच्याविरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती अनिल फापाळे याच्यासह सासरच्या तिघांना अटक केली आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहेत. मृत योगीता यांचे भाऊ संतोष गवळी यांनी फिर्यादीत सांगितलं की, ’माझी बहीण योगीता गावच्या सरपंच झाल्यापासून सासरच्या मंडळींकडून तिला वारंवार त्रास दिला जात होता. किरकोळ कारणातून आणि चारित्र्याच्या संशयातून मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळून योगिता यांनी मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास विष प्राशन केलं. यानंतर पती अनिल फोपाळे यांनी तातडीनं योगीता यांना उपचारासाठी लासलगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं.


पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. याठिकाणी गेल्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्राथमिक तपासणी करून योगीता यांना मृत घोषित केलं. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. मृत महिला सरपंचाच्या भावानं दिलेल्या फिर्यादीनुसार पतीसह सासु-सासरे आणि दीर यांच्याविरोधात कौटुंबीक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.