kundlik khande

सामान्य कुटूंबातील युवक जिल्हाप्रमुख झाला, हे प्रस्थापितांच्या जिव्हारी लागले

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

कामाचा धडका, वाढते पक्ष संघटन पाहून मला खोट्या गुन्ह्यात गोवले कुंडलिक खांडे यांचा पत्रकार परिषदेत आरोप

प्रतिनिधी । बीड
दि.25 ः कुठलाही राजकिय वारसा नसलेला माझ्या सारखा सामान्य कुटुंबातील युवक शिवसेनेचा जिल्हाप्रमुख झाला. हे काही प्रस्थापितांच्या जिव्हारी लागले होते. दरम्यान जिल्हाप्रमुख बनल्यानंतर ‘जिथे कमी तिथे मी’ या धोरणाने काम सुरू केले. माझा काम करण्याचा धडका व पक्ष संघटन पाहून अनेकजण अस्वस्थ झाले होते. मला कुठेतरी गोवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. या परिस्थितीत मला गुटखा प्रकरणात गोवण्यात आले. गुटखा प्रकरणी माझा काहीही संबंध नव्हता, फक्त महिलांना त्रास दिल्याची माहिती मिळाली म्हणून तिथे गेलो. हीच संधी साधून माझ्यावर आकसबुध्दीने गुन्हा नोंद करण्यात आला. अखेर न्यायालयाने या प्रकरणात मला जामिनही दिला. सत्याला परेशान करता येते परंतू पराजित नाही हे यातून स्पष्ट झाले आहे, असे जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती मिळालेले कुंडलीक खांडे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. यावेळी बीड, गेवराई व आष्टी, पाटोदा, शिरुर विधनसभा मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


यावेळी बोलताना कुंडलिक खांडे म्हणाले की, मला कसलाही राजकीय वारसा नाही, सामान्य शेतकरी कुटुंबातून मी शिवसेने सारख्या 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण करणार्‍या पक्षाचा जिल्हाप्रमुख झालो. पद मिळाल्यानंतर माझ्या काम करण्याच्या पध्दतीतून आणि दिवसातील 16 तास काम करून शिवसेचा जिल्हाप्रमुख पक्ष संघटनेसाठी काय करू शकतो हे दाखवून दिले. झपाटून गेल्याप्रमाणे दिवसरात्रं काम करण्याच्या माझ्या या पध्दतीमुळे काही जणांना ते रुचले नव्हते. याच लोकांचे काही तरी षडयंत्र रचून मला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू होते. पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे हे लोक माझ्या विरोधात तक्रारी करत, विरोधात निवेदनही देत होते. मात्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांना माझ्यावर आणि माझ्या काम करण्याच्या पध्दतीवर विश्वास असल्याने त्यांची डाळ शिजत नव्हती. यात गुटखा प्रकरण घडले. या प्रकरणाशी माझा काहीही सबंध नसताना मला गोवण्यात आले. केवळ महिलेवर अन्याय होत आहे, म्हणून मी तिथे गेलो. या व्यतिरिक्त या प्रकरणाशी माझा कसलाही सबंध नाही. गुटख्याचे गोदाम माझे नाही, पकडलेली गाडी माझी नाही, असे असतानाही थेट माझ्यावर दाखल केलेला गुन्हा षडयंत्राचा भाग होता. न्यायालयाने यात जामीन मंजूर केला आहे. आगामी काळात दुधाचे दुध आणि पाण्याचे पाणी होणार आहे. षडयंत्रकारी लोक एखाद्या नेतृत्वाला परेशान करू शकतात परंंतू पराजित कदापीही करू शकत नाही. माध्यमांमधून चुकीची चर्चा सुरु आहे. परंतु पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, ना.आदित्य ठाकरे जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असेही खांडे म्हणाले. यावेळी या पत्रकार परिषदेस शिवसेना सचिव वैजिनाथ तांदळे, शिवसेना जिल्हा समन्वयक जयसिंग चुंगडे, शिव वाहतूक सेना जिल्हाप्रमुख मशृभाई पठाण, अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख हुसेनभाई शेख, जिल्हासंघटक रतन गुजर, उपजिल्हाप्रमुख आशिष मस्के, उपजिल्हाप्रमुख बंडू पिंगळे, उपजिल्हाप्रमुख एजाजभाई शेख, उपजिल्हासंघटक भारत जाधव, सरपंच गणेश खांडे, ज्येष्ठ नगरसेवक भिमराव वाघचौरे, माजी नगरसेवक रामसिंग टाक, तालुका प्रमुख बीड गोरख सिंघण, पाटोदा तालुकाप्रमुख राहुल चौरे, शिरुर तालुकाप्रमुख किरण चव्हाण, आष्टी तालुकाप्रमुख कुमार शेळके, तालुका समन्वयक आर्जून नलावडे, तालुका समन्वयक रमेश तंबारे, युवानेते गणेश उगले, उपतालुकाप्रमुख संजय उगले, उपतालुकाप्रमुख संतोष घुमरे, उपतालुकाप्रमुख संदीप सोनवणे, उप तालुका प्रमुख शिवाजी कोलगुडे, युवानेते निलेश जाधव, शहर प्रमुख परमेश्वर बेदरे, उपशहर प्रमुख कल्याण कवचट, तालुका समन्वयक जालिंदर वांढरे, गोरख कदम, उपविभागप्रमुख रणजित कदम, नानासाहेब घल्लाल, युवानेते रमेश शिंदे, युवानेते प्रदीप शिंदे आदींची उपस्थिती होती.


दोष सिध्द झाला तर
राजकारणातून संन्यास घेईल

गुटखा प्रकरणाशी माझा कसलाही सबंध नाही. या प्रकरणात मी दोषी आढळलो तर राजकारणातून सन्यास घेईल. परंतू माझ्यावर गुन्हा दाखल करणार्‍या अधिकार्‍याने देखील मी निर्दोष सिध्द झाल्यास आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे माझे आव्हान आहे असेही खांडे म्हणाले.

जिल्हाप्रमुख पद नसले तरी
शिवसैनिक म्हणून काम करेल

शिवसेनेतील सर्व पदाधिकार्‍यांचा मला पाठींबा आहे. माझ्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे. जर माझे पद अबाधित राहिले तर सर्वांना सोबत घेवून अथवा मला पदावरुन दूर केल्यासही जे जिल्हाप्रमुख होतील, त्यांच्यासोबत एक शिवसैनिक म्हणून काम करेल. कारण मी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेबांचा कडवट सैनिक असल्याचे खांडे म्हणाले.

पंकज कुमावत यांनी पक्षाला
बदनाम करण्याची सुपारी घेतली

गुटखा प्रकरणाशी काहीही संबंध नसताना, महिलेने कुठलाही लेखी जबाब दिलेला नसताना माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र माझा न्यायदेवतेवर विश्वास होता. आपण जे काम केले नाही, त्यामुळे घाबरण्याची कारण नाही. कुमावत यांच्याकडे कुठलाही जबाब असेल, मोबाईल जप्त केलेला आहे, त्यामध्ये काही पुरावा असेल तो न्यायालयात सादर करावा. सुपारी मिळाल्यासारखे पक्षाल बदनाम करु नये. तसेच या संदर्भात शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचेही खांडे यांनी सांगितले.

Tagged