atyachar

पोलीस कर्मचारी, होमगार्ड, सेवानिवृत्त नायब तहसीलदारास घेतले ताब्यात!

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे


अंबाजोगाईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण
अंबाजोगाई
: दि.9 एका अल्पवयीन मुलीवर 400 ते 500 जणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणामध्ये मागील 24 तासात एका पोलीस कर्मचार्‍यासह होमगार्ड, सेवानिवृत्त नायब तहसीलदारासह आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अंबाजोगाई शहरामध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ राहणार्‍या अल्पवयीन मुलीच्या शरिराचे 400 ते 500 जणांनी लचके तोडल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात 8 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर एक एक धक्कादायक बाबी पुढे येवू लागल्या. ज्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला ती निराधार अवस्थेमध्ये एकटीच असल्याचा गैरफायदा अनेकांनी उचलला यात कधी पैशाची अमिष तर कधी जबरदस्ती तर कधी वेगवेगळ्या अमिषाचा बळी ठरलेल्या या अल्पवयीन पिडीतेवर शेकड्यावर लोकांनी अत्याचार केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दहा ते बारा जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेले आहे. अत्याचार करणार्यांमध्ये पोलिस कर्मचार्याचा समावेश असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने पोलिसांवरच ताशेरे ओढत आरोपीला अटक का होत नाही असा प्रश्न उपस्थितीत केला होता. न्यायालयाच्या याच भूमिकेमुळे पोलिसांनी गेल्या 24 तासामध्ये आठ जणांना अटक केली असून यामध्ये एक पोलिस कर्मचारी, एक होमगार्ड, लॉज चालक असलेले एक माजी नायब तहसीलदार व इतर एक लॉज चालक, एक लॉजचा मॅनेजर अशा आठ जणांचा समावेश आहे. ताब्यात घेतलेल्या या आठ जणांना न्यायालयात उभे केले जाणार असून न्यायालय यांना किती दिवसाची पोलिस कोठडी सुनावते हेच पहावे लागेल. या प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर या करीत आहेत.

Tagged