स्वाराती रुग्णालय परिसरात आढळले मृतावस्थेतील स्त्री जातीचे अर्भक

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे

अंबाजोगाई येथील घटनेने खळबळ

अंबाजोगाई : येथील स्वाराती रुग्णालय परिसरात चनई रोडवर असलेल्या मुलांचे वसतीगृह इमारतीच्या कंपाउंड वॉललगत मृतावस्थेत असलेले स्त्री जातीचे अर्भक आज (दि.४) सकाळी आढळले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

वसतिगृहाच्या परिसरात अर्भक असल्याचे सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आले. त्यांनी घटनेची माहिती अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना दिली. त्यांनी तातडीने पोलिसांना पाठवून घटनेचा पंचनामा करून मृत अर्भक शासकीय रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात दिले. दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Tagged