पाटोदा शहराजवळील घटना
पाटोदा दि. 14 : मंजरसुंबा- पाटोदा रोडवर टेम्पो आणि कारच्या भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सहा जनाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी महामार्ग पोलिसांनी धाव घेतली असून जखमींना पाटोदा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
पाटोदा तालुक्यातील जीवचिवाडी येथील रहिवासी असलेले रामराव कुटे हे सलग चार पाच दिवस सुट्या असल्याने पुणे येथे आपल्या मुलीला आणण्यासाठी गेले होते. संपूर्ण कुटुंब गाडीतून परत येत असताना पाटोदा शहराजवळ पाटोदा – मंजरसुंबा मार्गावरील बामदळे वस्तीजवळ आयशर टेम्पो आणि स्विफ्ट कार यांचा समोरासमोर अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहने चक्काचूर झाली आहेत. या अपघातात कुटे कुटुंबातील दोन मुले, एक महिला, एक पुरुष आणि एका मुलीचा समावेश आहे. तर अन्य एका मुलीचा अपघातात मृत्यू झाला आहे.