बीडमध्ये आढळले अर्भक!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


बीड : शहरातील जालना रोडवरील टाटा शोरूमच्या समोर एका प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये नवजात अर्भक मृतावस्थेत आढळल्याची घटना गुरुवारी (दि.3) सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी शिवाजीनगरचे सहायक निरीक्षक अमोल गुरले, बीड शहरचे अशपाक सय्यद, मनोज परजने आदींनी धाव घेतली, तसेच घटनास्थळी नागरिकांनीही मोठी गर्दी केली आहे.


बीड शहरातील जालना रोड परिसरातील साई विठ्ठल प्रतिष्ठान समोरील मोकळ्या जागेमध्ये अर्भक आढळल्याने शहरांमध्ये खळबळ उडाली आहे. बकेट मधील अर्भक पूर्ण झाकल्यामुळे हे अर्भक स्त्री जातीचे आहे की पुरुष जातीचे हे मात्र समजू शकले नाही. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांकडून तपासले जात आहेत.

Tagged