BEEED JILHA PARISHAD

सीईओ अजित पवार यांची उचलबांगडी, आयएएस अविनाश पाठक बीडचे नवे सीईओ

न्यूज ऑफ द डे


प्रतिनिधी । बीड
दि.4 : जिल्हा परिषदेचे मग्रूर सीईओ अजित पवार यांना अखेर बीड जिल्ह्यातून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आयएएस अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच अन्य नऊ आयएएस अधिकार्‍यांच्या देखील राज्य शासनाने बदल्या केल्या आहेत. तुर्तास अजित पवार यांना कुठलीही पोस्टींग देण्यात आलेली नाही.
जलजीवन मिशनच्या कामामध्ये बीड जिल्ह्यातील कंत्राटदारांना खिरापतीप्रमाणे पैसा वाटण्यात आला. त्यांचे मन मानेल त्या पध्दतीने त्यांनी कंत्राटदारांना कामे दिली होती. जलजीवनच्या कामात प्रचंड मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे.

Tagged