uddhav

आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्या लोकांची पेन्शन होणार बंद

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र राजकारण

कोरोना पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारचा निर्णय

मुंबई: कोरोनाने आधीच सर्वजण हैराण असताना, महाविकास आघाडीने एक मोठा निर्णय घेतला आहे. फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय मागे घेण्याचे महाविकास आघाडीने ठरवले आहे. 1975 ते 1977 दरम्यान आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्या लोकांची पेन्शन आता बंद होणार आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर असलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

काय आहे योजना?
2018 मध्ये महायुतीने हि योजना राबविण्यास सुरवात केली होती तेव्हा शिवसेना देखील सत्तेत सहभागह होती. या योजनेअंतर्गत, 1 महिन्याहून जास्त काळ तुरूंगवास भोगलेल्या व्यक्तीस 10,000 रुपये आणि त्याहून कमी तुरूंगवास भोगलेल्या व्यक्तीस 5,000 रूपये पेन्शन देण्यात येते. त्या व्यक्तीच्या निधनानंतर तिच्या साथीदाराला अर्ध्या पेन्शनचा लाभ मिळतो.

Tagged