भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी पंकजा मुंडे, विनोद तावडे; खडसेंना पुन्हा डावलले

न्यूज ऑफ द डे बीड

मुंबई : भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाची नवी कार्यकारिणी तयार केली असून यामध्ये राष्ट्रीय सचिव पदावर माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही घोषणा जे.पी.नड्डा यांनी शनिवारी केली.

पंकजाताई मुंडे यांचा परळी विधानसभेत पराभव झाल्यानंतर त्या सक्रिय दिसून आल्या नाहीत. त्यानंतर भाजपने काही महत्वाच्या निवडी केल्या, त्यात पंकजाताई मुंडे यांना डावलण्यात आले. त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजाताई मुडे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळणार असे सुतोवाच केले होते. आता नव्या कार्यकारिणीत विनोद तावडेंसह पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. आणि पुन्हा एकदा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना डावलण्यात आले आहे. पंकजाताई मुंडे यांना यापूर्वी निवडीदरम्यान डावलल्यानंतर आणि विनोद तावडेंना तिकिट नाकारल्यानंतर पहिल्यांदाच पक्षाने राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी दिली आहे. एकूण 13 जणांना राष्ट्रीय सचिव म्हणून म्हणून नेमण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रालते 4 नेते आहेत. पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांची नावे या यादीत आहेत. याशिवाय राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या यादीत खासदार हीना गावित यांना स्थान देण्यात आलं आहे. अल्पसंख्याक मोर्चाचे नेतेम म्हणून जमाल सिद्दीकी यांचं नाव आहे.

-राष्ट्रीय सचिव पदी पंकजा मुंडे, विनोद तावडे
-खडसे यांना पुन्हा डावलले
-कार्यकारिणीत दोन माजी मुख्यमंत्री (रमनसिंह, वसुंधराराजे)
-फडणवीस मात्र नाहीत

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील महाराष्ट्राचे चेहरे
राष्ट्रीय सह महामंत्री:
व्ही सतीश
राष्ट्रीय मंत्री:
पंकजा मुंडे
विजया रहाटकर
विनोद तावडे
सुनील देवधर

राष्ट्रीय प्रवक्ता:
खासदार हिना गावित
संजू वर्मा (मुंबई)

अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष
जमाल सिद्दीकी

Tagged