भाजपयुमो राष्ट्रीय अध्यक्षपदी 29 वर्षीय खा.तेजस्वी सूर्या

देश विदेश न्यूज ऑफ द डे राजकारण

बीड : भारतीय जनता पार्टीने तरूण तडफदार खासदार तेजस्वी सूर्या (वय 29) यांच्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील पूनम महाजन यांच्यावर ही जबाबदारी होती.

तेजस्वी सूर्या हे बेंगलोरच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघातून 2019 मध्ये खासदार झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेले आहेत. तसेच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रीय सदस्य म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेले आहे. यापूर्वी ते पूर्वी युवा मोर्चाचे सरचिटणीसपदावर होते.

Tagged