railway indian

श्रीगोंदा-बेलवंडी स्थानकांदरम्यान मालगाडीचे ७ वॅगन रूळावरून घसरले,रेल्वे वाहतूक ठप्प

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

अहमदनगर : सोलापूर रेल्वे विभागातील श्रीगोंदा – बेलवंडी स्थानका दरम्यान मालगाडीचे ७ वॅगन घसरले; मनमाड मार्गे उत्तर भारतात जाणाऱ्या बहुतांश गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

आज भल्या पहाटे श्रीगोंदा स्टेशनपासून अगदी नजीक तीन किलोमीटर अंतरावर दौंडकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचे १२डबे रुळावरून घसरल्याने मोठा अपघात झाला मालवाहतूक करणारी रेल्वे असल्याने कोणतीही जीवीतिहानी किंवा कुणीही यात जखमी झालेले नाही

परंतु रेल्वे रुळांचं मात्र मोठ्याप्रमाणात नुकसान झालं असून या रेल्वे अपघातामुळे दौंड नगर रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे
या अपघातानंतर या मार्गावरील सर्व रेल्वेगाड्या मागील स्टेशनवरच रोखण्यात आल्या आहेत सिमेंट वाहतूक करणाऱ्या या मालवाहतूक गाडीला ४२डबे होते त्यातील १२डबे रुळावर घसरले सदर घटनेबाबत बेलवंडी व श्रीगोंदा पोलिसांना माहिती मिळाली त्यानंतर पेट्रोलिंग करणाऱ्या पो उपनिरीक्षक गट,व पो कॉ प्रकाश मांडगे यांनी अपघातस्थळी धाव घेतली रेल्वेमार्ग दुरुस्त होण्यास वेळ लागणार असल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक बऱ्याच वेळेसाठी ठप्प राहणार आहे

Tagged