beed dcc

डीसीसी बँक निवडणुकीवर पंकजा मुंडेंनी घातला बहिष्कार

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : येथील डीसीसी बँक निवडणूक रिंगणातून मतदानाच्या काही तासांपूर्वीच भाजपच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडेंनी माघार घेतली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत मुंडेंनी ही घोषणा केली आहे.

यावेळी मस्के यांच्यासह रमेश आडसकर, अक्षय मुंदडा यांच्यासह भाजप गोटातील उमेदवारांची उपस्थिती होती. मुंडे म्हणाल्या, डीसीसी बँक निवडणुकीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सत्तेचा वापर केला. त्यामुळे ८ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीवर भाजप बहिष्कार घालत आहे. आम्ही लोकशाही  प्रक्रिया म्हणून या निवडणूकीकडे पाहत होतो. पण निवडणुकीत सत्तेचा गैरवापर होतोय. सहकार मंत्र्यांवर दबाव आणून अन्याय होतोय असं जाहीर निवडणूक प्रक्रियेवरच बहिष्कार टाकला.

Tagged