bycycal olsd man

सायकलवरून फिरणार्‍या जिल्हाधिकार्‍यांना महिला कॉन्स्टेबलने अडवले

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे


दि. 22 : सगळीकडेच कडक लॉकडाऊन असतानाही जिल्हाधिकारी सायकवरून फिरत होते. तेवढ्यात या जिल्हाधिकार्‍यांची सायकल रस्त्यावर ड्यूटीला असलेल्या महिला कॉन्स्टेबलन अडवली आणि विचारलं… कुठं निघालाय? मात्र काही वेळात जिल्हाधिकार्‍यांनी मी या शहराचा डीएम आहे असे सांगताच महिला कॉन्स्टेबल घाबरली. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी तिच्या या कामाचं कौतूक केलं आहे. असंच काम करीत रहा म्हणत जिल्हाधिकारी पुढे निघून गेले.

ही घटना राजस्थानमधील भिलवाडा येथील जिल्हाधिकार्‍यांसोबत घडली. मंगळवारी जिल्हाधिकारी शिवप्रसाद एम. नकाते यांनी शहरातील लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी सकाळीच सायकलवरून प्रस्थान केले. जिल्हाधिकारी शहरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, परंतु ते सायकलवरून फिरत असल्याची त्यांना कल्पना नव्हती. या कालावधीत गुलमंडी परिसरातील ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी निर्मला स्वामींनी टी-शर्ट परिधान केलेल्या जिल्हाधिकार्‍यांना ओळखलंच नाही आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा रस्ता अडवून चौकशी केली. महिला पोलिसाच्या तत्परतेमुळं जिल्हाधिकार्‍यांना थांबावंच लागलं.

महिला कॉन्स्टेबलने जिल्हाधिकारी नकाते यांना विचारलं, तुम्ही कुठे जात आहात, घरीच रहा ना, भाई. तेवढ्यात जिल्हाधिकार्‍यांच्या मागून येणार्‍या बंदूकधारक कर्मचारी म्हटला अहो मॅडम, कुणाला थांबवत आहात… हे सर आहेत.



महिला कॉन्स्टेबलने जिल्हाधिकारी नकाते यांना विचारलं, तुम्ही कुठे जात आहात, घरीच रहा ना, भाई. तेवढ्यात जिल्हाधिकार्‍यांच्या मागून येणार्‍या बंदूकधारक कर्मचारी म्हटला अहो मॅडम, कुणाला थांबवत आहात… हे सर आहेत. तेवढ्यात जिल्हाधिकारीही सामान्यपणे म्हणाले की, मी डीएम आहे. या प्रकारामुळं काही वेळ महिला कॉन्स्टेबल घाबरून गेल्या. परंतु, जिल्हाधिकारी नकाते यांनी महिला कॉन्स्टेबलसोबत घडलेला हा प्रसंग अगदी सहजतेनं घेत, तिच्या कामाच्या तत्परतेचं कौतुक केले आणि त्यांनी पुढे विविध ठिकाणी जाऊन पोलिस कर्मचार्‍यांची भेट घेत आढावा घेतला.