14 महिन्याच्या मुलीचा मृतदेह बंधार्‍यात आढळला!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


नांदूरफाटा येथील प्रकार; घातपातची शक्यता
नेकनूर दि.11 :
नेकनूर येथील जवळच असलेल्या नांदुरफाटा येथे एका 14 महिन्याच्या मुलीचा मृतदेह शनिवारी (दि.11) सकाळी बंधार्‍यात तरंगताना आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी नेकनूर पोलिसांनी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेकनूरच्या रुग्णालयात दाखल केला.
अक्षरा बाबासाहेब पडूळकर (वय 14 महिने) असे त्या मयत मुलीचे नाव आहे. बाबासाहेब पडूळकर यांच्या घराशेजारी बंधारा असून अक्षरा कालपासून बेपत्ता होती. शनिवारी सकाळी तिचा मृतदेह बंधार्‍यात आढळून आल्याने खळबळ उडाली. नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख मुस्तफा, क्षीरसागर, सानप यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेकनूरच्या रुग्णालयात आणण्यात आला. दरम्यान कालपासून बेपत्ता असलेल्या अक्षराचा मृतदेह 24 तासानंतर घराशेजारील बंधार्‍यात आढळून आल्याने घातपातची चर्चा होत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tagged